अब्दुल वाहेद सरांना भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार प्रदान 

Beed

अब्दुल वाहेद सरांना भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार प्रदान 

द रियल हिरोज् पुस्तकाचे प्रकाशन;दुग्ध शर्करा योग जुळला 

बीड/प्रतिनिधी

जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या मिल्लिया प्राथमिक उर्दू शाळेतील सहशिक्षक अब्दुल वाहेद गुलाम मोहम्मद सरांना भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांनी संकलित केलेल्या द रियल हिरोज् या पुस्तकाचे प्रकाशन ही करण्यात आल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आला.

सदरील पुस्तक हे भारताच्या थोर व्यक्तीमत्वांचे जीवन व सेवा वर आधारित आहे. हा कार्यक्रम मुप्टा उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला. यात प्रमुख पाहुणे म्हणून उर्दू मुप्टा संघटनेचे सचिव शाहिद कादरी, राज्य उपाध्यक्ष शफी इनामदार, राज्य संघटक अय्युब कादरी, पुणे जिल्हा सल्लागार हनुमंत चव्हाण, पुणे विभागीय अध्यक्ष मुस्तफा सय्यद, जिल्हा सचिव शेख समीर, जिल्हा अध्यक्ष युनूस पटेल व उमर चिशती उपस्थित होते. 

यावेळी अब्दुल वाहेद गुलाम मोहम्मद यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांनी संकलित केलेल्या द रियल हिरोज् पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आल्याने या दुग्ध शर्करा योग जुळून आला. यापूर्वीही त्यांनी तामीर चमन नावाचे पुस्तक जानेवारी २०२१ साली संकलित केलेले आहे. जे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी, निबंध, भाषण, नाटक आणि सुञसंचालन वर आधारित आहे. याशिवाय सामान्यज्ञान, बोधकथा, सोनेरी म्हणी इत्यादीच्या संकलनाचे कामही सुरु आहे. यामुळे त्यांच्यावर सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, उर्दू मुप्टा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Sharing

Visitor Counter