आ.सुरेश धस यांनी थकित वेतन धारक शिक्षकांचा प्रश्‍न लावला मार्गी

Ashti

आ.सुरेश धस यांनी थकित वेतन धारक शिक्षकांचा प्रश्‍न लावला मार्गी

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

मार्च 2014 ते नोव्हेंबर 2015 या कालावधीमध्ये एकूण 64 शिक्षकांचे थकीत वेतन रखडले होते.या थकीत वेतनासाठीचा निधी आठ जून रोजी गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग देखील करण्यात आला होता परंतु गटविकास अधिकारी यांची बदली झाल्यामुळे हा प्रश्न लांबणीवर पडला होता माञ आ.धस यांनी पुढाकार घेत तो मार्गी लावून त्याचा धनादेश आ.सुरेश धस यांच्यासह गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे,पं.स.सभापती बद्रीनाथ जगताप यांच्या उपस्थितीत शिक्षकांना सुपुर्द करण्यात आला.
या सर्व थकीत वेतन धारक शिक्षकांनी याबाबत आ.सुरेश धस यांची दि.21 जून रोजी भेट घेऊन शिक्षकांचे थकीत वेतन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर याची दखल घेत आ.धस यांनी आठ दिवसाच्या आत थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे सांगितले.त्यामुळे मार्च 2014 ते नोव्हेंबर 2015 या कालावधीमधील 20 महिण्यांचे थकीत असलेल्या वेतनाचा प्रश्न सोमवार दि.29 रोजी मार्गी लावून आ.धस यांनी शिक्षकांना दिलेला शब्द पुर्ण केल्यामुळे या शिक्षकांनी आ.धस यांचे आभार मानले आहेत.

Sharing

Visitor Counter