जिल्हाधिकार्यांचे नवीन आदेश दुकानांना उघडण्यास परवानगी !
जिल्हाधिकार्यांचे नवीन आदेश दुकानांना उघडण्यास परवानगी !
(बीड प्रसार न्युज)
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी पहाटे जिल्ह्यासाठी नवीन आदेश काढले ज्यात ग्रामीण व शहरी भागात आज पासुन वेळ बदल्ला असुन सकाळी ७ ते २ या कालावधीत दुकाने उघडे ठेवण्याचा निर्णय जिल्हा अधिकारी यांनी घेतला.
आज दिनांक १३ मे पासून ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने एक दिवसाआड सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिली असुन यामध्ये किरकोळ किराणा दुकानासह इतर सर्व प्रकारची दुकाने देखील उघडण्याची परवानगी दिली.परंतु भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळण्यात आली आहेत.
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी पहाटे काढलेल्या आदेशामध्ये किरकोळ व्यापार्यांना नागरिकांना मोठा दिलासा भेटला आहे. तसेच निडलीअॅप विषयी दिनांक ९ मे रोजीच्या संपूर्ण आदेशास कसल्याही प्रकारचा प्रतिबंध नसला तरीही त्याचा वापर सर्व किराणा दुकानदारांच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले.