माध्यमिक शिक्षण विभागाच्या स्थापना विभागातून एसआयटीमध्ये आलेल्या शाळेचा रेकॉर्ड कुठे गेला?

Beed

माध्यमिक शिक्षण विभागाच्या स्थापना विभागातून एसआयटीमध्ये नाव आलेल्या शाळेचा रेकॉर्ड कुठे गेला?

वर्षाताई जगदाळे लवकरच एसआयटीकडे तक्रार दाखल करणार !

प्रतिनिधी

माध्यमिक शिक्षण विभागाच्या आस्थापना शाखेत संबंधित शाळेचा रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आस्थापना विभागाने संबंधित शाळेचा रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या प्रकरणात केवळ एका शाळेचाच नव्हे, तर माध्यमिक शिक्षण विभागात आणखी किती शाळांचे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत, याची पडताळणी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. विभागातील नोंदी नेमक्या कशा आणि कोणत्या कारणामुळे गायब झाल्या, याचा शोध घेणेही तितकेच महत्त्वाचे मानले जात आहे.या संदर्भात आस्थापना विभागात रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची तक्रार लवकरच एसआयटीकडे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, शिक्षण विभागातील नोंदी गायब होण्यास जबाबदार असलेले कर्मचारी कोण आहेत? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर पुरेसे नियंत्रण नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत का?असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या संचालकांकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.माहितीच्या अधिकारातून संबंधित शाळेचा रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची बाब उघड झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे या एसआयटी पथकाकडे निवेदनाद्वारे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे समजते.आस्थापना विभागात नेमके काय दडले आहे? रेकॉर्ड का उपलब्ध नाहीत आणि त्यासाठी जबाबदार कोण? याचा उलगडा चौकशीतून होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sharing

Visitor Counter