चिंताजनक! देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण; मुंबईतील ३ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

तसेच ज्यावेळी प्रकरण आणखी वाढलं त्यावेळी आम्हाला कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले. त्यासाठी आम्ही बीएमसीकडून ज्या खासगी लॅबना टेस्टची परवानगी दिली आहे त्यांना बोलावून सँपल दिलं. रिपोर्टनुसार माझी पत्नी आणि मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या पत्नी आणि मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २४,८१८ लोक क्वारंटाइनमध्येस, तर १८२८ लोक आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यातील सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर्स यांना एक जास्तीची पगारवाढ देण्याची शिफारस आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत असल्याचेही ते म्हणाले. लोकमत फेसबुकच्या माध्यमातून बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

Sharing

Visitor Counter