लोखंडवाडीच्या ऐश्वर्या पवार हिने रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये मारली बाजी

लोखंडवाडीच्या ऐश्वर्या पवार हिने रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये मारली बाजी
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी ऐश्वर्या मच्छिंद्र पवार हिने अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल मध्ये इयत्ता बारावीच्या मध्ये 90% गुण मिळवून बायोलॉजी या विषयांमध्ये 98 गुण घेऊन कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे .लोखंडवाडी या छोट्याश्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या ग्रामीण भागातील ही विद्यार्थिनीने अहमदनगर येथे शिक्षण घेत इयत्ता दहावी व बारावी मध्ये उज्वल यश संपादन केले आहे, ऐश्वर्या पवार हिचे वडील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र पवार हे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हनुमान विद्यालय घाटा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ,ऐश्वर्याने प्राथमिक शिक्षण हे लोखंडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर पुढील शिक्षण हे अहमदनगर येथील रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये झाले, इयत्ता दहावी मध्ये 94 टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते ऐश्वर्याने आपण डॉक्टर होणार असल्याचे यावेळी सांगितले, तिच्या या यशाबद्दल माजी आमदार भीमराव धोंडे ,रेसिडेन्सीयल हायस्कूल चे प्राचार्य ए. आर. दोडके, उपप्राचार्य बाळासाहेब सुर्वे ,प्रा. नितीन भुसाळ,प्रा. दादासाहेब वांढेकर, प्रा, श्रीमती स्वाती बोरूगले, प्रा, राजश्री घुले यांच्यासह आदींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








