बीड तालुक्यातील घोसापूरी जवळच्या काही क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

बीड तालुक्यातील घोसापूरी जवळच्या काही क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू
बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील घोसापूरी जवळ १ रुग्ण कोरोना विषाणूची लागण (covid 19 positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे या रुग्णाच्या घराच्या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
बीड तालुक्यातील घोसापूरी येथे एक रुग्ण आढळून आला असून सदर रुग्णाचे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले घराचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लॉक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.








