गेवराई शहरातील काही परिसरात कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्‍चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

Beed

गेवराई शहरातील काही परिसरात कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्‍चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

 बीड/प्रतिनिधी 

गेवराई शहरातील दाभाडे गल्ली , माळी गल्ली आणि राज्यमार्ग जालना रोड या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

        याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

गेवराई शहरातील गंगाभिषण बिहारीलाल भुतडा, राज्यमार्ग, जालना रोड, गेवराई हा  परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे

गेवराई शहरातील  दाभाडे गल्ली येथील  गणेश भुते यांचे घर ते   अंकुश दाभाडे यांच्या घरा पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तसेच माळी गल्ली येथील दिनकर विठ्ठल वादे यांचे घर ते  सुधाकर फुले यांच्या घरा पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे

 प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून वरील या सर्व ठिकाणी अनिश्‍चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असून वरील तीनही ठिकाणच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

         राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहिताचे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.

Sharing

Visitor Counter