नगरसेवक व नगराध्यक्ष फक्त नावालाच का? कालची रात्र लोकांनी रोड वर काढली

Beed

नगरसेवक व नगराध्यक्ष फक्त नावालाच का? कालची रात्र लोकांनी रोड वर काढली 

बीड/सय्यद अशफाक

कालच्या पावसामुळे बीड शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने नागरिकांची खूपच अडचण निर्माण झाली होती तर काही लोकांना आपली रात्र घरा बाहेरच काढावी लागली.

काल बीड शहरात पावसाने चांगलीच हाजेरी लावली परंतु  या  पाऊसात लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल देखील झाले रात्रभर काही भागात घरात पाणी साठल्यामुळे नागरिकांना रोडवर आपली रात्र काढावी लागली परंतु या लोकांकडे कोणत्याच नगरसेवक किंवा नगराध्यक्षाचे लक्ष गेले नाही म्हणून नगरसेवक व नगराध्यक्ष फक्त नावालाच का?असा प्रश्न या ठिकाणी नागरीकांना उपस्थित होत आहे.

खासबाग नदीपात्रातून मोमीनपुरा कडे नदीतुन जानारा रोड देखील वाहुन गेल्यामुळे देखील नागरीकांना अडचन निर्माण झाली असुन नगराध्यक्ष हे काम कधी करतील असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीला प्रशासन आपली चांगलीच भूमिका पार पाडत आहे तर नगरपरिषदेचा पण कर्तव्य आहे की त्यांनी या सांडपाण्याचा किंवा ज्या भागात पाणी साठलेला आहे त्या भागातून  पाणी काढून देण्याचा प्रयत्न करावा
कारन साठलेल्या पाण्यामुळे मच्छर देखील होण्याची शक्यता आहे व लोकांचा आरोग्य देखील धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट दिसुन येत आहे यामुळे नगराध्यक्ष साहेबांनी थोडासा वेळ काढून लक्ष देण्याची गरज आहे.
 

Sharing

Visitor Counter