बीड जिल्हा रुग्णालय हा माझा घर, तर मी या घराचा कुटुंब प्रमुख-डॉ.अशोक थोरात

बीड जिल्हा रुग्णालय हा माझा घर, तर मी या घराचा कुटुंब प्रमुखडाॅ.आशोक थोरात
बीड/प्रतिनिधी
करोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालयत कोरोना रुग्णाचा उपचार चालू आहे या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी आपली चांगली भूमिका पार पाडत आहे परंतु उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना गैरसमज होतात की या ठिकाणी आमचे कर्मचारी तोंड बघून उपचार करतात परंतु हे कितपत योग्य आहे.
जिल्हा रुग्णालयात असला काहीच प्रकार नाही जिल्हा रुग्णालयात या ठिकाणी जर असा काही असता तर काल झालेल्या मृत्यूमध्ये माझ्या कुटुंबातील परिचारिका आज जिवंत असते तिला १४ तास व्हेंटिलेटरवर ठेवला परंतु ती मरण पावली जर या ठिकाणी तोंड बघून उपचार झाला असता तर त्या जिवंत नसते का? असा सवाल देखील उपस्थित होतो.
लोकांनी भिऊ नये,परंतु काळजी घ्यावी
कोरोनाची लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु या कोरोनाला भीती सारखे काहीच नाही प्रत्येक निमोनिया झालेल्या व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह नसतो म्हणून लोकांनी भिऊ नये परंतु योग्य ती काळजी घ्यावी.विनाकारण घरा घराबाहेर पडु नये ,सॅॅॅनिटाय वापरावे,सोशलडिस्टन ठेवावा,मास्क वापरावे.
कुटुंब प्रमुख या नात्याने मी रात्रभर जागाच असतो
नागरिकांची देखभाल मी कुटुंब प्रमुख या नात्याने स्वतः करतो माझा मोबाईल नंबर प्रत्येक वॉर्डात आहे मला रात्री कितीही वाजता रुग्णाचा किंवा नातेवाईकांचा फोन आला तर मी फोन घेतो त्यांना योग्य ते माहिती देतो व सकाळी ११ ते ०१ पर्यंत मी स्वतः रुग्णाच्या नातेवाईकांना बीड जिल्हा रूग्णालयात भेटण्यासाठी बसलेलो असतो.








