बीड, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील आणि अंबाजोगाई शहरातील काही ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल

बीड, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील आणि अंबाजोगाई शहरातील काही ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल
बीड/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील संत कबीर नगर आणि बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी व वंजारवाडी ,परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव, अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी या गावातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी कळविले आहे.
बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी व वंजारवाडी ,परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील कंटेनमेंट झोन शिथिल करण्यात आले आहेत.
यासह अंबाजोगाई शहरातील शिक्षक कॉलनी, मोरेवाडी येथील नवनाथ विठ्ठलराव सोनवणे यांचे घर ते भारत सखाराम देशमाने यांच्या घरापर्यंत या भागातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे
तसेच अंबाजोगाई शहरातील संत कबीर नगर येथील कृष्णाबाई धारोबा बनसोडे यांचे घर ते नानासाहेब विठ्ठल कांबळे यांच्या घरापर्यंत या भागातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे
या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.
बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.








