बकरीद ईद निमित्ताने मुस्लिम धर्म गुरूंची बैठक जिल्हा अधिकारी कार्यालयात संपन्न

बकरीद ईद निमित्ताने मुस्लिम धर्म गुरूंची बैठक जिल्हा अधिकारी कार्यालयात संपन्न
बीड /प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाने आयोजित केलेल्या मुस्लिम धर्म गुरूंची बैठक संपन्न झाली असुन या बैठकीत जिल्हा अधिकारी यांनी मुस्लिम धर्म गुरू व मुस्लिम समाज सेवकांना आव्हान केले की आपआपल्या भागातील एक व्यक्ती तयार करा जे पुर्ण भागाला बकरी ईदला बकरी आनुन देईल व यामुळे लोकांची गरदी होनार नाही व एक सोबत खरेदी केल्यावर स्वस्त दरात देखील बकरी भेटतील व लोकांना त्रास देखील होनार नाही.
ईद ची मस्जीद मध्ये नमाजाची परवानगी बाबत
दुसरा मुद्दा असा कि राज्य शासनाने लॉकडाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा आदेश आहे सर्व मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज आपल्या घरीच पढावी व मस्जीद मध्ये नमाज ला परवानगी नाही जर कोनी मस्जीद मध्ये नमाज पडली किंवा आदेशाचे पालन केले नाही तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
मी सगळ्या धर्म गुरूंचा आभारी आहे त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतीसाद दिला
जिल्हा अधिकारी यांनी सर्व धार्मिक गुरूंचे आभार देखील व्यक्त केले ते बोल्ले त्यांनी आज पर्यंत प्रशासनाने खुप मदत केली व पुढे देखील आम्हाला मदत करतील अशी आशा देखील व्यक्त केली व आपनच आपल्या भागाची जिम्मेदारी घ्यावी असा देखील उपस्थित लोकांना सांगीतले.
ईद से खुशियाॅ घर लाय,बिमारी नही
जिल्हा अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना अव्हान केले की त्यांनी ईद निमित्ताने कुठे ही गर्दी करू नये सॅनिटायजर व मास्क वापरा आपल्या घरी ईद निमित्त आनंद साजरा करायचा आहे आपल्याला आपल्या घरी कोरोना सारखी आपत्ती नाही घेऊन जायची त्यासाठी आपण योग्य ती काळजी घेणे खुप गरजेचे आहे.








