आष्टीतील तिसरा रुग्णही उपचारानंतर घरी परतला; आष्टी शहर कोरोनामुक्त

Beed

आष्टीतील तिसरा रुग्णही उपचारानंतर घरी परतला; आष्टी शहर कोरोनामुक्त

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

आष्टी शहरातील तिसरा रुग्ण करोनामुक्त झाला आहे. आज (शनिवार) दुपारी या रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सायंकाळी घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी औक्षण करीत या रुग्णाचे स्वागत केेले.
आष्टी शहरातील लिमटेकी गणेश मार्गावर असलेल्या संभाजीनगर परिसरातील या रुग्णाला खोकल्याचा त्रास होत असल्याने खबरदारी म्हणून स्वॅब दिला होता. ता. १५रोजी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या रुग्णाला दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत बरा होऊन आज हा रुग्ण घरी परतला.
रुग्णवाहिकेचे आगमन झाल्यावर कुटुंबीयांनी औक्षण करून रुग्णाचे स्वागत केले. तिसरा रुग्ण घरी परतल्याने आष्टी शहर करोनामुक्त झाले आहे.

Sharing

Visitor Counter