स्थापना दिनानिमित्त रेपेवाडी शाळेत स्वच्छता अभियान राबवून साजरा

Beed

स्थापना दिनानिमित्त रेपेवाडी शाळेत स्वच्छता अभियान राबवून साजरा 

धारूर/प्रतिनिधी

तालूक्यातील रेपेवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमीक शाळेत शाळेच 57 वा स्थापना दिवस शाळेच्या परीसरात स्वच्छता अभियान राबवून पालकाना विद्यार्थ्याचे दैंनदीन अभ्यासक्रमाचे नियोजन सांगून साजरा करण्यात आला.
कोरोना मुळे शाळा बंद असल्यामुळे रेपेवाडी जि प प्राथमीक शाळेच्या  परिसरात खूप गवत वाढले होते व कचरा निर्माण झाला होता,त्यामुळे शाळेच्या  57 व्या दिवस विवीध कार्यक्रमानी व सर्व प्रशासनाचे नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला या शाळेची  स्थापना 25 जुलै 1964  दिनानिमित्त  शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या तर्फे शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला.कोरोना परिस्थिती पाहता सोशियल अंतर ठेऊन योग्य काळजी घेण्यात आली.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 4ते 5  विद्यार्थ्यांचे गट केले आहेत, तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षणप्रेमी आहेत,त्यानुसार रोज दिलेला अभ्यास विद्यार्थी पूर्ण करतात, त्या गटाची ही पाहणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी मुख्याध्यापक रमेश रुद्रे, सह शिक्षक अर्जुन मंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारोती रेपे, ग्राम. सदस्य बालासाहेब शेंडगे, शिक्षणप्रेमी रतन शेंडगे, सर्जेराव रेपे आदी मान्यवर उपस्थित होते

Sharing

Visitor Counter