शैक्षणिक,सामाजिक,क्षेत्रात भरीव कार्य करणारे दिग्ज व्यक्तिमत्व अंकुशजी चव्हाण यांचा भिम स्वराज्य सेनेत जाहीर प्रवेश

शैक्षणिक,सामाजिक,क्षेत्रात भरीव कार्य करणारे दिग्ज व्यक्तिमत्व अंकुशजी चव्हाण यांचा भिम स्वराज्य सेनेत जाहीर प्रवेश
मराठवाडा प्रवक्तेपदी करण्यात आली निवड
बीड (प्रतिनिधी) 27 जुलै
शिव,शाहु,फुले,आंबेडकर,साठे या महामानवांचा वैचारिक वारसा जोपासत अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड पुकारून सामाजिक क्रांति करणारी भिम स्वराज्य सेना ही एकमेव सामाजिक संघटना असुन
संघटनेच्या कार्याला प्रेरित होऊन सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे चळवळीतील जेष्ठ व्यक्तिमत्व अंकुशजी चव्हाण यांनी आज भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक विकासजी जोगदंड यांची भेट घेऊन भिम स्वराज्य सेनेत प्रवेश केला व त्यांची भिम स्वराज्य सेनेच्या मराठवाडा प्रवक्ते पदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आल्याचे संस्थापक/अध्यक्ष विकासजी जोगदंड यांनी जाहीर केले
निवडी प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतांना अंकुश चव्हाण यांनी सांगितले की भिम स्वराज्य सेना ही एकमेव अशी संघटना आहे की ती बहुजनांच्या सर्वांगीण प्रगती साठी कार्यरत आहे विकासजी जोगदंड यांचे नेतृत्व सर्व समावेशक असुन तेच बहुजन समाजाला सत्तेच्या प्रवाहात आणू शकतात येणाऱ्या काळात गावं तिथं शाखा हे अभियान राबवून मराठवाड्यात भिम स्वराज्य सेनेचे मजबुत संघटन उभारणार असल्याचा ठाम निर्धार ही त्यांनी यावेळी बोलतानां केला
याप्रसंगी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक विकासजी जोगदंड यांचे सह आदर्श महाराष्ट्र केरोसीन हॉकर्स संघटनेचे राजाध्यक्ष अशोकजी कांबळे, मंगेश जोगदंड, राजेशभाई कोकाटे, भिम शाहीर सुरज वंजारे,अजय जोगदंड,महादेव वंजारे आदीं उपस्थित होते








