लाखा येथे हरणाची शिकार करणारे वनविभागाने मुद्देमाला सह पकडले एकजन ताब्यात तिन फरार धारूर वनविभागा ची थेट कारवाई

लाखा येथे हरणाची शिकार करणारे वनविभागाने मुद्देमाला सह पकडले एकजन ताब्यात तिन फरार धारूर वनविभागा ची थेट कारवाई
किल्लेधारूर/प्रतिनिधी
धारूर वनविभागास लाखा येथे पारधी वस्ती वर हरणाची शिकार झाल्याची खबर रविवारी दुपारी मिळताच वनपरीक्षेञ अधिकरी एम एस मुंडे यांनी पथका सह जाऊन बंद खोली वर धाड मारून एका आरोपीस मुद्देमाला सह ताब्यात घेतले यावेळी इतर तिन आरोपी माञ या ठिकाणाहून फरार झाले.याप्रकरणी धारूर वनविभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
धारूर येथील वनपरीक्षेञ कार्यालय हद्दीत
केज तालूक्यातील लाखा येथील पारधी वस्ती वर हरणाची शिकार केल्याची माहीती रविवारी दुपारी एक च्या दरम्यान वनअधिका-याना खबर लागली हि खबर लागताच वनपरी क्षेञ अधिकारी एम एस मुंडे यांनी तात्कळ आपल्या कर्मचाऱ्यांचा पथका सह घटनास्थळी गेले त्यांचे सोबत वनरक्षक एल जी वरवडे एस ए मोराळे सभांजी पारवे वाहन चालक शाम गायसमूद्रे यांचे सह साडे चार ते पाच चे दरम्यान या ठिकाणी धाड टाकली बंद खोलीत हि जाळे हरणाचे मास या मुद्दे माला सह आरोपी भास्कर कल्यान काळे यांला ताब्यात घेतले .यावेळी इतर तिन आरोपी माञ फरार झाले या हरणाचे शिकार करणे प्रकरणी
वन्य जिव संरक्षण अधिनीयम 1972 अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला असून विभागीय वन अधिकारी एम बी तेंलग यांचे मार्गदर्शना खाली वनपरीक्षेञ अधिकारी मुंडे हे करत आहेत फरार आरोपी लवकरच ताब्यात घेऊ असे मुंडे यांनी सांगीतले








