पीक कर्ज हवे असूनही न मिळालेल्या शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे आवाहन
Beed

पीक कर्ज हवे असूनही न मिळालेल्या शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे आवाहन
बीड/प्रतिनिधी
पीक कर्ज हवे असूनही न मिळालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे विनंती करण्यात आली असून 29, 30, व 31 जुलै 2020 रोजी त्यांनी आपली माहिती संबंधित तलाठयांकडे विहित नमून्यात दयावी.यामध्ये शेतकऱ्यांचे आधार, क्रमांक मोबाईल क्रमांक, एकुण क्षेत्र यासह विविध माहिती मिळाल्यानंतर बँकेकडे जिल्हा प्रशासनाकडून पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळणेबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे
(सोबत माहिती साठी नमुना)








