कर्तव्य दक्ष पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या सह कर्मचाऱ्यांना सँनिटायझर मास्क वाटप--चंद्रकांत साबळे

कर्तव्य दक्ष पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या सह कर्मचाऱ्यांना सँनिटायझर मास्क वाटप--चंद्रकांत साबळे
बीड/प्रतिनिधी
शहरात दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस कर्मचाऱ्यांना दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजु पैठणे यांच्या हस्ते सँनिटायझर मास्क कर्तव्य दक्ष पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार व पोलीस कर्म च्यारेयांना सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आले.
बीड शहरात काही दिवसापासून कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. या आजाराने अनेक नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून पोलिस आणि आरोग्य कर्मचारी जनतेची सेवा करीत आहेत. त्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळावे यासाठी राजु पैठणे यांनी पुढाकार घेतला असून आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त पोलिस कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. दीपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वतीने कर्तव्य दक्ष पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना व ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सँनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु पैठणे, चंद्रकांत साबळे व मोहसिन शेख सह आदी उपस्थित होते.








