आ.सुरेश धस यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार संपन्न

आ.सुरेश धस यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार संपन्न
आष्टी/प्रतिनिधी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवार दि.२९ जुलै रोजी जाहीर झाला.
तालुक्यातील इयत्ता दहावीत विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ.सुरेश धस यांनी केला आहे. आज इयत्ता दहावीच्या निकाल जाहिर झाला असून,यामध्ये तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ.धस यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.यावेळीवेळ वसुंधरा माध्यमिक विद्यालय आष्टी प्रथम हर्षवर्धन धस - १००%,द्वितीय - सानिका शिंदे - १००%, तृतीय - श्रावणी गर्जे - ९९.६०% तर श्री गणेश विद्यालयातील प्रथम ओंकार शहाजी वारंगुळे ९६.२०%,द्वितीय मोहसीन फकीर शेख ९३.२०%,तृतीय सृजल राजेंद्र मुळे, प्रणिता कुंडलीक सारुक ९३%
कन्या प्रशाला आष्टी वैष्णवी पोकळे ९५.४०%,वेदांती देशपांडे ९४.८०%,स्वेता गायकवाड ९४.४०%,साक्षी बबन पगारे ९०%
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ. सुरेश धस व सौ. प्राजक्ताताई धस यांच्या हस्ते करण्यात आला.आ. धस यांनी पत्रकार स्व. बबन पगारे यांची मुलगी साक्षी पगारे हिला ९०% गुण संपादन केल्याने तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेऊन उच्च शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची जबाबदारी घेतली.
यावेळी माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,विस्तार अधिकारी मनोरंजन धस तसेच मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
आ. धस यांनी पत्रकार स्व. बबन पगारे यांची मुलगी साक्षी पगारे हिला ९०% गुण संपादन केल्याने तिचा सत्कार केला. तसेच तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेऊन उच्च शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची जबाबदारी यावेळी घेतली.








