रिपाई ( ए ) च्या 30 व्या वर्धापन दिन व मा . दिपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Beed

रिपाई ( ए ) च्या 30 व्या वर्धापन दिन व मा . दिपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

बीड/प्रतिनिधी 

रिपाई ( ए ) चा 30 वा वर्धापन दिन व रिपाई ( ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा . दिपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या बीड शहरातील पुतळयास बीड जिल्हाध्यक्ष किशोरजी कागदे यांचे हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन उदंड आयुष्य लाभण्यासाठी अभिवादन करण्यात आले . 

बीड जिल्हा रिपाई ( ए ) मध्यवर्ती कार्यालय रिपाई ( ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा . दिपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष किशोरजी कागदे व रिपाई ( ए ) चे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला . 

आदरणीय दिपकभाऊ निकाळजे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन समाजकार्य करणे किती आवश्यक आहे . त्याचे भान ठेऊन बीड शहरातील " जिव्हाळा " शहरी बेघर निवारा केंद्र बीड येथे रिपाई ( ए ) च्या वतीने निवारा केंद्रावर वृक्षारोपण , फळे , अन्नदान तेथील पुरुष व महिलांना या कार्यक्रमाअंतर्गत वाटप करण्यात आले . मा . जिल्हाध्यक्ष किशोर कागदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रिपाइं ( ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . सुमित ओव्हाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिजित कदम तालुका अध्यक्ष बीड यांनी केले . या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रिपाइं ( ए ) जिल्हाध्यक्ष किशोरजी कागदे , जिव्हाळा निवाऱ्याचे मुख्य व्यवस्थापक श्री . वंजारे साहेब , श्री . वीर साहेब , जिल्हा सचिव प्रा . सुनिल थोरात , युवक जिल्हाध्यक्ष निखिल भैय्या सवाई , अभिजित कदम , तालुकाध्यक्ष , शहरअध्यक्ष अक्षय कोकाटे , बीड युवक शहर अध्यक्ष राज मस्के , विद्यार्थी अध्यक्ष वैभव बनसोडे , आनंद गवळी , श्री . हिरवे विजय , अरुण गवळी , महेश मस्के , आदि रिपाइं ( ए ) चे सर्व पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते . आपला विश्वासू किशोरजी कागदे अध्यक्ष बीड जिल्हा रिपाइं ( ए ) सर्व पद अधिकारी व बहुसंख्येने कार्याकर्ते उपस्थित होते. 

Sharing

Visitor Counter