आ.सुरेश धस मिञ मंडळ,छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाच्या वतीने आयोजीत शिबीरात 163 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Beed

आ.सुरेश धस मिञ मंडळ,छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाच्या वतीने आयोजीत शिबीरात 163 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

आष्टी/प्रतिनिधी 
बीड प्रसार न्युज

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक हाॕस्पीटल्समध्ये सध्या रक्त पुरवठा अत्यंत कमी स्वरुपात आहे.या पार्श्वभूमीवर आष्टी शहरात आ.सुरेश धस मिञ मंडळ व छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाच्या वतीने दि.1 आॕगष्ट रोजी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती,बकरी ईद,लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी,भगवान जिव्हेश्वर यांची जयंती याचे औचित्य साधून नगरपंचायत येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 163 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोव्हीड 19 चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सद्यस्थितीत सर्वच हाॕस्पीटल्समध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा सर्वञ दिसून येत आहे.याचाच एक भाग म्हणून भारतीय नागरिक या नात्याने आपले कर्तव्य बजावण्यासाठी एकञ येऊन रक्तदान करण्याचे आवाहन आ.सुरेश धस मिञ मंडळ व छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.या शिबीरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून 163 नागरिकांनी यावेळी रक्तदान केले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सुनील रेडेकर,श्याम धस,पिंकू बळे,दुर्गेश कुलकर्णी,अश्पाक आतार,संतोष रणसिंग,बाळासाहेब घोडके,शैलेश सहस्त्रबुद्धे,प्रितम बोगावत,बब्बू शेख,राहूल शिंगवी,सिताराम टेकाडे,श्रीकांत भोज,अक्षय धोंडे,विजय धोंडे,गणेश जाधव,सोमनाथ भिसे,आयाज सय्यद,सचिन रानडे,रवि तांबे,आदेश निमोणकर,शिवाजी पोकळे,योगेश वांढरे,यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Sharing

Visitor Counter