प्रा. राजेंद्र बरकसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

प्रा. राजेंद्र बरकसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती
गेवराई/प्रतिनिधी
येथील विविध क्षेत्रात सामाजिक , शिक्षण, सांस्कृतिक, कला ,साहित्य, क्रीडा, पत्रकारिता आदी क्षेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ नाट्यकलावंत प्रा. राजेंद्र रंगनाथराव बरकसे यांची त्यांच्या प्रदीर्घ कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश संचलित चित्रपट -कला - साहित्य - सांस्कृतिक विभागाच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ. सुधीर निकम यांनी पत्राद्वारे नियुक्ती केली आहे . गेवराई येथील सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा, पत्रकारिता क्षेत्रातील अग्रगण्य असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रा. राजेंद्र बरकसे हे गेली छत्तीस वर्ष नाट्यकलावंत म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या नाट्य अभिनयाची सुरुवात महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलनातील तीन अंकी "वरचा मजला रिकामा" या नाटकातील नानामामा या विनोदी भूमिकेपासून केली. त्यानंतर हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ, ग्रामीण नाट्य मंडळ अशा विविध नाट्यसंस्थाच्या माध्यमातून जवळपास 25 तीन अंकी नाटके आणि एकांकिका यांच्यामधून त्यांनी आपल्या अभिनयातून नाट्यसृष्टी गाजवली आहे. आर .बी .अट्टल महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण शिक्षक या पदावर गेली अनेक वर्ष काम करत सांस्कृतिक विभागाचे काम पहात असताना अनेक कलावंत घडविले. जे आज राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेची जोपासना करत आहेत .उदरनिर्वाहाचे साधन म्हणून महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरीय विद्यार्थी खेळाडू म्हणून घडविण्याचे कार्य केले आहे राज्यात व राज्याबाहेर अनेक विद्यार्थी खेळाडू मोठमोठया पदावर सेवारत आहेत.विच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न अशा विविध लोकनाट्यात तसेच हंगर स्ट्राईक, रघुचा संसार, विषारी पालवी आदी एकांकिकेतून आपल्या भूमिका साकारल्या. अनेक नाटकांची निर्मिती,लेखन ,दिग्दर्शन ,गायन, नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे.पंचगंगा गीतांचा मेळामध्येही बालकलाकार म्हणून काम केलेले आहे. महाविद्यालयाच्या, विद्यापीठाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या अनेक जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवक महोत्सव - क्रीडा स्पर्धा आयोजनात सक्रीय सहभाग घेतलेला आहे.एम.ए., एम.कॉम., एम.पी.एड., एम.एड., एम.सी.जे., योगा टीचर, योगा ट्रेनर शिक्षण असलेले उच्चविद्याविभूषित असं हे व्यक्तिमत्त्व विविध कला ,साहित्य , सांस्कृतिक, क्रीडा ,पत्रकारिता, सामाजिक, आणि पुरोगामी चळवळीतील कार्य करत पुढे आले आहेत. शारीरिक शिक्षणाबरोबरच आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांनी पतंजली योग समितीच्या माध्यमातून योग शिक्षक म्हणूुन अनेक व्यक्तींना विविध व्याधीपासून दूर राहण्यासाठी योगा आणि प्राणायमाचे धडे दिलेत योगशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी आणि जिल्हाभरात योग शिबिरे घेतलेली आहे .याची दखल घेऊन त्यांच्या निमंत्रणावरुन पतंजली विद्यापीठाचे प्रमुख -योगगुरू स्वामी रामदेव बाबा गेवराईलाही आले होते. थोर समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे जी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे सचिव म्हणून,नरेंद्र दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणून, गेवराई न्यायालयामध्ये सलग १० वर्ष लोक न्यायालयात (लोक अदालतमध्ये ) कौन्सिलर म्हणून , कोर्टाच्या फॅमिली वेल्फेअर कमिटीमध्ये सदस्य म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून भूकंपग्रस्तांना १९९३ मध्ये अर्थसाह्य, १९९१ मध्ये तरुण कलाकारांना एकत्र करून अष्टविनायक ज्ञानदीप कला व क्रीडा मंडळाची स्थापना करून या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये अनेक वर्ष काम पाहिले. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे स्थानिक स्तरावर अध्यक्ष , महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय विभागस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून २५ वर्षापासून काम पहात आहे. बीड जिल्हा खो-खो संघटनेचे ते सहसचिव असून बीड जिल्हा कबड्डी व योगासन संघटनेचे सक्रिय काम पाहत आहेत .कबड्डी ,खो -खो, अँथलेटिक्स, योगासन आदी विविध क्रीडा प्रकाराचे राज्यस्तरीय पंच म्हणून काम, गेल्या पंचवीस वर्षापासून दैनिक चंपावतीपत्र बीड या वर्तमानपत्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून, स्थानिक गेवराई परिसर या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक ,गौरीपूर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ,चंपावती प्रतिष्ठान औरंगाबादचे संस्थापक सचिव,क्रीडा पत्रकार संघ बीडचे उपाध्यक्ष ,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ,सचिव , श्री.संताजी महाराज युवक मंडळाचे अध्यक्ष, महापुरुषांच्या सार्वजनिक व्याख्यानमालेचे आयोजक, जनशिक्षण संस्थानचे बोर्ड मॅनेजमेंट सदस्य ,साक्षरता अभियान समिती सदस्य ,गेवराई तालुका क्रीडा संकुल समितीचे सदस्य ,लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव तपासणी समितीचे सदस्य, साने गुरुजी कथामाला संस्थेचे जिल्हा सदस्य, बीड जिल्हा खाजगी शिकवणी विरोधी समिती सदस्य, पॅरा ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष, पेन्टाक्यू असोसिएशनचे कार्याध्यक्ष ,बीड जिल्हा रिंग बॉल असोसिएशनचे सचिव, खो-खोच्या महाराष्ट्र संघटनेचे प्रसिद्धी समितीचे सदस्य ,कबड्डी संघटनेच्या छाननी समितीचे सदस्य म्हणून कार्य केलेले आहे.जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना निमंत्रित केलेल्या निनाद कृषि परिषदेचे आयोजन यशस्वीरीत्या केलेले आहे. प्रा. राजेंद्र बरकसे यांच्या विविध सामाजिक ,क्रीडा, पत्रकारिता , सांस्कृतिक,पुरोगामी चळवळ ,कला , साहित्य आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रा. बरकसे यांना नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य परिषदेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अॅवॉर्ड, आदर्श शिक्षक पुरस्कार ,यशवंत युवा गौरव पुरस्कार ,उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार, आदर्श शारीरिक शिक्षक पुरस्कार, कै. सुनील देशमुख शोध पत्रकारिता पुरस्कार ,राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार ,बेस्ट रिपोर्टर पुरस्कार ,दर्पण दिन पुरस्कार ,बेस्ट फिजिकल टीचर अवॉर्ड असे विविध पुरस्कार प्राप्त प्रा. बरकसे यांना संपूर्ण साक्षरता अभियान समिती जिल्हाधिकारी, बीड ,सामाजिक कार्याबद्दल पोलीस अधिक्षक, बीड ,व्यसनमुक्तीचे प्रसार व प्रचारकार्य केल्यामुळे जिल्हा दारूबंदी कार्यालय ,तहसील कार्यालयाकडून उत्कृष्ट आयोजक म्हणून महाराष्ट्र राज्याच्या गोल्डन ज्युबिली वर्षानिमित्त सन्मान, बाल महोत्सव सन्मान ,गेवराई नगर परिषदेचा स्वच्छता अभियान व क्रीडा महोत्सव सन्मान ,महाराष्ट्र शासनाचा बेस्ट अँकर आणि आयोजक म्हणून सन्मान ,कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने सन्मान अशी अनेक सन्मानपत्रे त्यांना मिळालेली आहेत.राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय शालेय आणि असोसिएशन कबड्डी, खो-खो, योगा , अँथलेटिक्स इ क्रीडा स्पर्धेत पंच म्हणून उत्कृष्ट कार्य, कथा, कविता,वक्तृत्व, वादविवाद, लोकनृत्य, गीत गायन, इ.स्पर्धेसाठी विविध ठिकाणी परिक्षक, आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेअंतर्गत योगा ट्रेनर म्हणून उत्कृष्ट कार्य, शैक्षणिक पात्रतेबरोबरच योग प्रशिक्षक डिप्लोमा शिक्षण, पत्रकारिता पदव्युत्तर पदवी तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून आणि अनेक राज्य ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवाद व चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. बीड आकाशवाणी केन्द्रात निवेदक, औरंगाबाद -बीड आकाशवाणी केंद्रांवरून कविता, जिल्हा वार्तापत्र, साक्षरता व लोकगीते आणि विविध प्रासंगिक माहिती असे अनेक उपक्रम सादर केले आहेत. या विविधरंगी कलागुण असलेल्या अष्टपैलू कलावंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. राजेंद्र बरकसे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार ,खासदार सुप्रियाताई सुळे ,प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील , चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीअंतर्गत असलेल्या चित्रपट, कला ,साहित्य व सांस्कृतिक विभाग मराठवाडा विभागाचे अध्यक्ष तथा चित्रपट कलावंत डॉ. सुधीर निकम यांनी प्रा. राजेंद्र बरकसे यांची सांस्कृतिक विभागाच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच पत्राद्वारे नियुक्ती केली आहे. पक्षाच्या धोरणानुसार या विभागाच्या माध्यमातून कलाकारांच्या व जनतेच्या शेवटच्या घटकांपर्यंत पक्षातील ध्येयधोरणे पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे कराल ,अशी अपेक्षा पत्रात केलेली आहे .प्रा. राजेंद्र बरकसे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकार, साहित्यीक,विद्यार्थी , मित्रपरिवार आदींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय शिवाजीरावजी पंडित ( दादा ), पालकमंत्री मा. ना.धनंजय मुंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते तथा राज्य सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित, युवा नेते बीड जि.प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, आर.बी. अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रजनीताई शिखरे , या विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ. सुधीर निकम यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.








