जिल्ह्यातील १४ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित, संचारबंदी लागू

जिल्ह्यातील १४ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित, संचारबंदी लागू
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे १४ ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे . या परिसरामध्ये अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) ,(३) लागू करण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव रुग्ण निघाल्यामुळे बीड शहरामधील पंचशील नगर, रोशन पुरा (बालेपीर) व फुलाई नगर, परळी शहर मधील स्नेहनगर, गांधी मार्केट, सावतामाळी मंदिर जवळ व बसवेश्वर कॉलनी, अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर, केज शहरांमधील कानडी रोड भन्साळी बिल्डिंग , धारूर शहरातील क्रांती चौक मेन रोड व लक्ष्मी नगर तसेच परळी तालुक्यातील कन्हेरवाडी, माजलगांव येथील पोलीस वसाहत भाटवडगाव व केज तालुक्यातील साळेगाव या ठिकाणी संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे . त्यामुळे जिल्ह्यात व तालुक्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्य करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाने लॉक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ लागू करण्यात आले आहेत.








