२८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले

गेवराई शहरातील ६ तपासणी केंद्रावर १३१० व्यावसायिकांची अॅन्टीजन तपासणी
२८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले
गेवराई शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी,बीड यांच्या आदेशानुसार गेवराई
शहरातील सर्व व्यवसायीक व कामगार वर्ग यांची अॅन्टीजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आली.तपासणीमध्ये २८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
सदर तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामध्ये १.जूनी नगर परिषद,बाजारतळ, गेवराई २.नगर परिषद कार्यालय,गेवराई. ३.नगर परिषद सभागृह गेवराई. ४. र.भ.अट्टल महाविद्यालय,गेवराई ५.जिल्हा परिषद कन्या प्रशाला, गेवराई व ६.पंचायत समिती गेवराई या ठिकाणांचा समावेश होता. सदर ठिकाणी प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ३० कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
गेवराई शहरातील ६ तपासणी केंद्रावर १३१० व्यावसायिक, कामगार सर्व प्रकारचे दुकानदार, फळ भाजी विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांची कोविड-१९ निदानासाठी अॅन्टीजन तपासणी( Antigen Test) करण्यात आली. सदर तपासणीमध्ये २८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. लागण झालेल्या २८ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले. सदर लोकांची तपासणी व निदान झाल्यामूळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यात मदत होणार आहे.
गेवराई शहरात एकाच दिवशी १३१० लोकांची Antigen Test करण्याची विशेष मोहिम श्री डाकणे मुख्याधिकारी नगर परिषद,गेवराई, डॉ. संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी ,तालुका गेवराई, डॉ.राजेश शिंदे, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय,गेवराई, श्री विजयसिंह शिंदे, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी बीड यांनी यशस्वी केली. सदर मोहिमेला गेवराई शहरातील श्री. प्रतापराव खरात, अध्यक्ष व्यापारी महासंघ, श्री.सुरेंद्र आप्पा रुकर, महासचिव, व्यापारी महासंघ, श्री संजय बरगे,उपाध्यक्ष व्यापारी महासंघ व सर्व प्रकारचे दुकानदार,फळ भाजी विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपचालक, इ. सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी याकामी मोलाचे सहकार्य करून उसफूर्त प्रतिसाद नोंदविला.








