कोरोना विषाणु संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वे सुरू

Dharur

कोरोना विषाणु संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वे सुरू

किल्लेधारूर/प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीइओ बीडच्या आदेशाखाली संपुर्ण जिल्ह्यात कोरोना विषाणू संबंधित अहवाल मागविण्यात येत आहे.त्याची सुरुवात आज धारूर शहरात करण्यात आली आहे.ज्यात कुटुंबप्रमुखाचे नाव,वय, कुटुंबातील सदस्य संख्या,मोबाईल क्रमांक, बाहेरगावाहून आलेले सदस्यांचे नाव,व अन्य माहिती घेतली जात आहे. कोरोना विषाणू संसर्ग हा संपुर्ण जिल्ह्यात गतीने वाढत चाललं असून जे कर्मचारी आपल्या दारात जीवा ची परवा न करता माहिती जमा करीत आहे. तरी संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी न घाबरता येणाऱ्या कर्मचाऱ्यास आपली संपूर्ण माहिती आपापल्या जबाबदारीने द्यावी व कोरोना विषाणुला आळा घालण्यासाठी सहकार्य करावे.अशी विनंती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे बीड जिल्हा विश्व मानव अधिकार परिषद शाखा बीड चे जिल्हा अध्यक्ष अतीक इस्माईल मोमीन यांनी केली आहे.

Sharing