प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2020-21

Beed

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2020-21

विमा पोर्टलवर शेतक-यांचे सातबारा दिसुन येत नसल्यास महसूल , बँक आणि विमा कंपनीच्या समन्वयाने सोडवणूक--जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी 

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2020-21 मध्ये  विमा भरताना ज्या शेतक-यांचे सात बारा विमा पोर्टलवर दिसत नसल्याच्या तक्रारी बाबत महसुल अधिका-यांनी असे सात बारा उतारे महाभुलेख पोर्टलवर अद्यावत करून बँक आणि विमा कंपनीच्या समन्वयाने तक्रारी सोडवण्यासाठी कार्यवाही केली जावी असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सूचित केले आहे 

बीड जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी यांचे मार्फत राबविण्यात येत आहे जिल्हयातील खरीप हंगाम 2020-21 मध्ये शेतक-यांना सहभागी होण्याची अंतीम मुदत ही 31 जुलै 2020 अशी होती. वरील मुदतीत विमा भरताना ज्या शेतक-यांचे सात बारा विमा पोर्टलवर दिसत नसल्याच्या अनेक गावातुन शेतक-याच्या तक्रारी येत आहेत यामुळे सदरील शेतक यांचे विमा प्रस्ताव तात्पुरत्या स्वरुपात बँके मार्फत स्विकारण्यात आले होते. 

बँकेने विमा प्रस्ताव विमा पोर्टलवर सादर करण्याची अंतीम मुदतही 15 ऑगस्ट 2020 अशी आहे.परंतु अद्यापही बँकांना विमा प्रस्ताव स्विकारलेल्या शेतक-यांचे प्रस्ताव अपलोड करतांना विमा पोर्टलवर शेतक-यांचे सातबारा दिसुन येत नाहीत. यासाठी संबंधीत बँकेने संबंधीत महसुल यंत्रणेकडुन शेतक-यांचे सातबारा महाभुलेख पोर्टलवर अद्यावत करुन घ्यावेत.

 यासाठी संबंधीत तहसिलदार यांना संबंधीत बँक शाखांनी तात्काळ अशा शेतक-यांच्या यादया उपलब्ध करुन द्याव्यात. तद्नंतर संबंधीत महसुल अधिका-यांनी असे सात बारा उतारे महाभुलेख पोर्टलवर अद्यावत केल्यानंतर संबंधीत बँक शाखांनी अशा शेतक-यांचे प्रस्ताव विमा पोर्टलवर अपलोड करावेत. 

अशाप्रकारे पडताळणी केलेल्या सातबारावर योग्य ती कार्यवाही करण्या संबंधीच्या सुचना संबंधीत विमा कंपनीला देण्यात आलेल्या आहेत. तरी त्यानुसार बँकेने व संबंधीत महसुली अधिका-यांनी कार्यवाही करावी व विहीत वेळेत विमा हप्ता व विमा प्रस्तावा बाबतची संबंधीताच्या स्तरावरील आवश्यक कार्यवाही करावी. याबाबत काही शंका असल्यास भारतीय कृषि विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. नितीन सावरणकर संपर्क क्रं.07307571488 यांच्याशी संबंधीत बँक अधिकारी अथवा महसुल अधिका-यांनी संपर्क साधावा.

Sharing

Visitor Counter