किल्ले धारूर नगर परिषदेचा गलथान कारभार , तीन रुग्णांना लागण होऊन ही आद्याप निर्जंतुकीकरण नाही

Dharur

किल्ले धारूर नगर परिषदेचा गलथान कारभार , तीन रुग्णांना लागण होऊन ही आद्याप निर्जंतुकीकरण नाही
 
किल्लेधारूर/रवी गायसमुद्रे

धारुर शहरात 8 कंटेन्मेंट झोन असून मठ गल्ली हे एक कंटेन्मेंट झोन आहे या कंटेन्मेंट झोन मध्ये 3 कोरोना रुग्ण बाधित असून अद्याप पर्यंत नगरपालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले नसून नगरपरिषद मठ गल्लीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे असे चित्र स्पष्ट दिसत आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर नागरीकाच्या मनात भितीचे वातावरण असुन लोक ज्यास्त भयभित झालेले आहेत व प्रशासन आपली चांगल्या प्रकारे भुमिका पार पाडताना दिसत आहे परंतु  नगर परिषदेचा या ठीकाणी गलथान कारभार दिसत आहे.

शहराती कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता धारुर शहरावर मोठे संकट आल्याचे स्पष्ट दिसत आहे मात्र किल्ले धारूर नगरपरिषद याला गांभीर्याने घेत नसल्याची स्पष्ट चित्र दिसत आहे. जर गांभीर्याने घेतले असते तर अता पर्यंत त्या ठिकाणी सॅनिटायजर फवारनी करण्यात आली असती परंतु नगर परिषदेचे कर्मचारी हे कोरोना ला अजुन गांभीर्याने घेतलेला नाही या ठीकाणी सपष्ट दिसुन येत आहे.

 नगरपरिषद नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे

शहरातील मठ गल्ली येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे काल निष्पन्न झाले मात्र या ठिकाणी नगरपरिषद च्या वतीने अद्याप निर्जंतुकीकरण करण्यात आले नसून नगरपरिषद गल्लीतील नागरिकांच्या जीवाशी खेळत तर नाही ना ?असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.

Sharing