सरस्वती विद्या मंदिर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सरस्वती विद्या मंदिर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बीड/प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून उच्चांक गाठला. नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेच्या निकालात शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.गुणवंत विद्यार्थी तुषार इंगोले,किर्ती भोगे,यश शिंदे,प्रतिक्षा राऊत, ऐश्र्वर्या भोसले,भक्ती शिंदे ,यश्री शिंदे,प्राची वडमारे ,यश उजेगर यांचा सत्कार शाळेचे सचिव मा. श्री.उत्तम पवार यांच्या हस्ते करण्यात आला करोनाच्य प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवत व शासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत हा सत्कार समारंभ पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव श्री.पवार सर म्हणाले की, ज्याप्रमाणे तुम्ही दहावीच्या परीक्षेत यश मिळवले ती यश मिळवण्याची भूक कायम ठेवा.डॉक्टर , इंजिनिअर, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक अशी महत्त्वाची पदे मिळवून देशसेवा करा.शाळेबरोबरच आई वडिलांचे व देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करा.असे आशीर्वचन श्री पवार सरांनी केले.याप्रसंगी बोलताना डॉ.नंदकुमार उघाडे म्हणाले की,एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ठराविक ठिकाणाची आवश्यकता नसते . प्रामाणिक प्रयत्न केले तर यश मिळविणे अवघड नाही.युपीएससी, एमपीएससी परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी दिल्ली किंवा पुण्याला जाण्याची गरज नसते.इथे राहून सुध्दा तुम्ही यश मिळवू शकता.मात्र त्यासाठी तुम्हाला अभ्यासातील सातत्य कायम ठेवावे लागेल.तुम्हाला स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी ही शाळा तुमच्या पाठीशी आहे.असे डॉ. नंदकुमार उघाडे म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ढोरमारे सर यांनी केले. या समारंभास शाळेतील शिक्षक श्री पाटील सर, श्री पाटोळे सर, श्री घोडके सर उपस्थित होते.हा सत्कार सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री कुंभार, श्री पिंगळे, श्री खांडेकर, श्री तोटे यांनी प्रयत्न केले.








