कोरोना काळात सामान्य नागरिकांची ॲम्बुलन्सवाल्याकडून लूट चालु

कोरोना काळात सामान्य नागरिकांची ॲम्बुलन्सवाल्याकडून लूट चालु !
बीड/प्रतिनिधी
सद्य परिस्थितीत सामान्य नागरिक चोहीकडून परेशान व बेहाल आहे गरिबांच्या हाताला काम नाही, व्यापार्यांचे व्यापार ठप्प आहेत, नौकरदारांना पगार नाही, अशा भयावह परिस्थिती देखील काही लोक सामान्य जनतेच्या आरोग्यशी खेळुन लोकांची लूट करत आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे आणि याचाच फायदा घेऊन शहरातील ॲम्बुलन्स वाल्यांनी सामान्य नागरिकांची अवाढव्य चालू केली आहे.
आज घडीला बीड ते औरंगाबाद रुग्ण हलविण्यासाठी पंधरा ते अठरा हजार रुपयांची मागणी ॲम्बुलन्स वाले करतात आणि जर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर पंचवीस हजार रुपये भाडे आहे हेच बाडे लाॅकडाउन पूर्वी चार हजार रुपये असे होते एवढेच नव्हे तर रूग्णांना आदित्य कॉलेज ते शहरात आणण्यासाठी पंधराशे रुपये घेण्यात येत आहे.
आरोग्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का?
एवढी लुटालूट चालू असताना ही प्रशासनाकडून याबाबत साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे या संदर्भीय प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून देखील कोणतीही कारवाई या लुटेरू लोकांविरोधात झालेली नाही यामुळे प्रशासन व ॲम्बुलन्स वाले या दोघांची काही साठ गाठ तर नाही ?असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत.








