12-08-2020 रोजी पासून शहर बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी व केज दहा दिवसाकरिता काही सेवा वगळता पूर्णपणे बंद

12-08-2020 रोजी पासून शहर बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी व केज दहा दिवसाकरिता काही सेवा वगळता पूर्णपणे बंद
बीड/प्रतिनिधी
कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणात वाढत आहे . त्याअर्थी , बीड जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची वाढ न होण्याचे दृष्टीने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहेत .
1. दिनांक 12/08/2020 रोजी रात्री 12.00 वा . पासून ( दिनांक ।। व 12 मधील रात्र ) बीड , परळी , अंबाजोगाई . आष्टी व केज हि शहरे 10 दिवसांकरिता ( दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत ) पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद राहतील . या शहरांमध्ये केवळ खालील सेवा चालू राहतील .
A) दूध विक्री घरपोच सकाळी 07.00 वा पासून ते सकाळी 09.00 वा पर्यंतच .
B)खाजगी व शासकीय रुग्णालय आणि केवळ रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकाने ( सबब सर्वांनी त्यांना लागणारी औषधे दिनांक 11/08/2020 रोजी पर्यंत खरेदी करुन घ्यावीत . )
C)माध्यम
D)घरगुती गॅस सिलेंडर सेवा ( संबंधित एजन्सी धारकांनी आपले एजन्सी चा गणवेश परिधान करावा व सोबत आपले ओळखपत्र बाळगावे . जार वाटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडील उपलब्ध भांडयामध्ये पाणी दयावे आणि त्यावेळेस कोबीड -19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार वाटर सप्लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास दयावे व रिकामी जार परत न घेता त्याच जार मध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा दयावी . तसेच सर्व वाटर सप्लायंस कर्मचारी यांनी नियमानुसार पास काढून घेवून सेवा पुरवावी .
i ) मोबाईल कंपनी ऑपरेटर्स यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार पास काढून सेवा दयावी . या शहरांमध्ये इतर सर्व सेवा / फळे - भाज्या इ.दुकाने / इतर सर्व दुकाने / खाजगी आस्थापना / बँक / पेट्रोलपंप / किराणा दुकाने ( होलसेन सह ) / कृषी विषयक दुकाने ( होलसेलसह ) / शासकीय कार्यालये , ( महसूल / पोलीस / आरोग्य / ग्रामविकास / नगरविकास / विद्युत वगळून ) बंद राहतील . या शहरांमधील कोणतीही व्यक्ती अति तातडीच्या वैद्यकीय गरजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबीसाठी घराबाहेर / शहराबाहेर जाऊ शकणार नाहीत . फक्त ई - पास घेऊनच असा प्रवास करता येईल . या शहरामध्ये सुध्दा केवळ याबाबीसाठीच ई - पास घेऊनच प्रवेश करता येईल . वरील कालावधीनंतर लगेचच शहरांत गर्दी होऊ नये यासाठी विविध प्रकाराची दुकाने वेगवेगळया दिनांकास सुरु परवानगी देण्यात येईल . त्यानंतर त्यांनी वरील प्रमाणे कारवाई करावी .
ii) , या दृष्टीने बीड शहरातील सर्व किराणा / खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना त्यांची दुकाने अन्टीजन टेस्ट झालेली नसेल तरीही त्वरीत उघडण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे . परंतु त्यांनी त्यांची अंन्टीजेन तपासणी त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच करुन घ्यावी . तसेच दिनांक 08 व 09 ऑगस्ट 2020 रोजी ज्या दुकानदारांची अंन्टीजेन तपासणी झालेली आहे . त्यांनीही दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी दुकाने उघडण्यास हरकत नाही .
iii). या पुढे ज्या कोरोना पाँझीटिव्ह रुग्णांना कोणतेही लक्षणे नसतील त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करुन आणि त्यांच्या घरीच विलगीकरण ची व्यवस्था समाधानकारकपण होऊ शकेल याची खात्री कल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरण ( Home Quarantine ) ची परवानगी देण्यात येईल , परंतु त्यांनी त्या विषयीच लेखी शपथपत्र सादर करणे आणि पल्स
मीटर विकत घेऊन दर तासाला स्वतःचे व दुसऱ्या मीटरने संपूर्ण परिवाराचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासत राहणे बंधनकारक असेल अशे जिल्हा अधिकारी यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे.








