धारूर घाटात टायर फुटल्याने गॅस टँकरचा अपघात

धारूर घाटात टायर फुटल्याने गॅस टँकरचा अपघात
किल्लेधारुर/प्रतिनिधी
धारूर येथील घाटात गॅस वाहातूक करणारा रिकाम्या टॅंकरचे समोरील टायर फुटल्याने कठडयाला धडक बसून अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली . अपघातात टँकरचे तोंड पाठीमागे वळले होते, मात्र मागील भाग कठड्याला अडकल्याने टॅंकर दरीत कोसळण्यापासून बचावले .
परळी येथून आलेला रिकामा गॅस टँकर एम .एच -४६, बीबी ९९०५ हा रिकामा धारूर मार्गे पुणे येथे जात होता .रविवारी दुपारी धारूर येथील घाटातून जात असतांना धोकादायक वळणाच्या ठिकाणी टँकरच्या इंजीन असणाऱ्या समोरील भागाचे डावीकडील टायर फुटले . या मुळे चालकाचा ताबा सुटल्याने कठड्याला धडक बसली . या अपघातात कठडा तुटून टँकरचा समोरील भाग परत फिरला . यात समोरील भागाचे एक टायर हवेत आधार झाले . मात्र मागील भाग कठड्याला अडकल्याने टँकर तिनशे फुट दरीत कोसळण्याबासून बचावले . या वेळी चालकाने व किन्नने उडी टाकून जिव बचावण्याचा प्रयत्न केला.








