किल्ले धारूर शहरामध्ये पत्रकार व व्यापाऱ्यांची ॲन्टीजेन कोरोना तपासनी व्हावी- मराठी पत्रकार परिषद

किल्ले धारूर शहरामध्ये पत्रकार व व्यापाऱ्यांची ॲन्टीजेन कोरोना तपासनी व्हावी- मराठी पत्रकार परिषद
किल्लेधारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर शहरामध्ये अॅटीजेन कोरोना टेस्ट व्यापारी वर्गाची व पत्रकारांची घेण्यात यावी त्यामुळे कोरोना चा प्रसार थांबवता येईल यामुळे अशी मागणी धारूर तालुक्याच्या मराठी पत्रकार परिषद या संघटनेने केली आहे
किल्ले धारूर शहरांमध्ये बीड पाठोपाठ धारूर शहरांमध्येही ही कोरोना अॅटीजेन टेस्ट घेण्यात यावी या कोरणा टेस्ट घेतल्यानंतर इतर लोकांना होणारा प्रसार थांबेल व कोरणा वर अंकुश येईल त्यामुळे धारूर शहरातील व्यावसायिक, पत्रकार बांधव ,कामगारांची ची अॅटीजेन कोरोना टेस्ट घेण्यात यावी अशी मागणी धारूर मराठी पत्रकार परिषद या पत्रकार संघटनेने केली आहे त्यामुळे पत्रकार ,व्यापारी, कामगार या लोकांचा संपर्क मोठ्या प्रमाणात नागरिकाशी येतो व या टेस्ट मुळे कोरूना चा होणारा प्रसार काही ना काही प्रमाणात आटोक्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर धारूर शहरातील व्यापारी कामगार व पत्रकार यांच्या टेस्ट घेण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे








