कोरोना रूग्णाचे हाल बे हाल का होत आहे साहेब ?

Beed

कोरोना रूग्णाचे हाल बे हाल का होत आहेत ?

बीड/प्रतिनिधी 

जिल्हा प्रशासनाकडुन  दोन दिवसांपासून घेण्यात येत असलेले अंटीजन टेस्ट मध्ये  शहरातील काही नागरीक पाॅजीटीव निघाले आहेत रूग्णंना आय.टी.आय काॅलेज ला स्थलांतरित केले परंतु आय टी आय मध्ये बेड नसल्याचे कारन सांगत आय.टी.आय च्या कंपाउंडवाल मध्ये  कुणी रसत्यावर तर कुनी वट्यावर बसलेले,झोपलेले होते या रूग्णांचे हाल का होत आहेत?असा प्रश्न रूग्णाच्या नातेवाईकामध्ये निर्माण झाला होता.

काल रात्री कोरोना पाॅजीटीव रूग्णांना आय.टी.आय मध्ये दाखल करण्यात आले होते परंतु त्या ठिकाणी जागा नसल्याने रूग्णांना नियोजन करूसतर बाहेरच ठेवण्यात आले परंतु त्या ठिकाणी 
काही जण  ओट्यावर , तर काही गवतावर बसून कसले नियोजन अशी चर्चा करू लागले तर काही रूग्ण  उपचार मिळण्याची वाट पहात होते.कोरोना च्या या पार्श्वभूमीवर प्रशासन आपली चांगल्या प्रकारे भुमिका पार पाडताना दिसत आहे परंतु काल जे रूग्णाचे हाल झाले तेअतिशय दुर्दैवी म्हणावे लागतील.

एवढे मोठ्या प्रमाणात अंटीजन टेस्ट होणार होत्या तर त्यांचा नियोजन का नाही केला ? असा प्रश्न रूग्णाच्या नातेवाईकामध्ये निर्माण झाला आहे.आरोग्य कर्मचारी स्टाफ खुप कमी असल्याने  त्या रूग्णावर उपचार कसा होईल?असा प्रश्न देखील लोकांना निर्माण होत आहे. प्रशासनाने अजुन कोरोनासाठी तयारी वाढवावी ,सटाफ वाढवावा अशी मागणी रूग्णाकडुन होत आहे. 

Sharing

Visitor Counter