विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी बीड शहरातील २६६५ व्यावसायिकांची अॅन्टिजन तपासणी, १३१ कोरोना बाधित आढळले होते

Beed

विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी बीड शहरातील २६६५ व्यावसायिकांची  अॅन्टिजन तपासणी, १३१ कोरोना बाधित आढळले होते

बीड शहरातील कोविड-१९ निदानासाठी झालेल्या विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी ६ तपासणी केंद्रावर २६६५ व्यावसायिकांची कोविङ-१९ अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये १३१ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मा.जिल्हाधिकारी,बीड यांच्या आदेशानुसार बीड
शहरातील सर्व व्यबसायीक व कामगार वर्ग यांची अॅन्टीजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आले होते. 

सदर तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती.

 १.बलभिम महाविद्यालय,बीड
 २.माँ वैष्णवीदेवी पॅलेस, एम.आय.डी.सी.रोड
३.जिल्हा परिषद शाळा ,अशोक नगर,
४.राजस्थानी विद्यालय,विप्रनगर
५.चंपावती प्राथमिक शाळा ,बुथ क.१ नगर रोड
६.चंपावती प्राथमिक शाळा ,बुथ क.२ नगर रोड
या ठिकाणांचा समावेश होता.

 सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ९४ कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. लागण झालेल्या १३१ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले. सदर लोकांची तपासणी व निदान झाल्यामुळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यास मदत होणार आहे

   या विशेष मोहिमेला बीड शहरातील  सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी याकामी मोलाचे सहकार्य करुन उत्सफूर्त प्रतिसाद नोंदविला.

Sharing

Visitor Counter