बी.सी.ग्रुपच्या वतीने अनथाना मदत

बी.सी.ग्रुपच्या वतीने अनथाना मदत.
बीड/प्रतिनिधी
"जिव्हाळा"शहरी बेघर निवारा केन्द्रातील अनाथांना महिलांचा आगळा वेगळा कार्यक्रम बी.सी ग्रुपच्या वतीने या संचार बंदी मध्ये किराणा देण्यात आला .
आज सर्व जगभरात "करोना"वायरस ने थैमान घातले आहे.अशा कठीण प्रसंगात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांच्या बी.सी ग्रुपच्या किर्ती दुग्गड ताईंनी बेघरांसाठी काही मदत हवी आहे का ? असे विचारले .
आज अचानक रोडच्या कडेला सापडलेले काही बेघर ,मनोरुग्ण ,अनाथ अशा २० ते २५ लोकांना मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निवारा केन्द्रात सोडण्यात आले.या सर्व ६०ते ६५ बेघरांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण देणे कठीण गेले असते असे व्यवस्थापक यांनी व्यक्त केले. परंतु महिला बी.सी. ग्रुप च्या वतीने या बेघरांसाठी जो किराणा देण्यात आला आहे त्याबद्दल आमच्या सर्व बेघर ,अनाथ ,मनोरुग्ण यांच्या कडुन व्यवस्थापक राजु वंजारे यांनी संगितले केले.








