अबाअंबाजोगई ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतःच ओढ़ावे लागते स्ट्रेचर

Ambajogai

आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाना स्वतः च ओढ़ावे लागते स्ट्रेचर
     
अंबाजोगई/वार्ताहर

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालय व महाविद्यालय अंबाजोगाई येथील रुग्णालयात मागील काही दिवसात तात्काळ 50 जनाची मेघा भर्ती करण्यात आली असत्ताना देखील रुग्णालयातील उपचार घेत असलेले रुग्णाच्या नातेवाईकाना स्वतःच स्ट्रेचरवर घेवून जावे लागत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर वायरल झाले आहे.वायरल सोशल मीडिया पोस्ट ने स्वामी रामानन्द तीर्थ मेडिकल कॉलेज मधे कार्यरत कायमस्वरूपी कर्मचारी आणि कॉन्ट्रेक्ट बेस्ड कर्मचारी किती आहेत?आणि रुग्णाच्या नातेवाईक जर का स्ट्रैचर खेचत असतील तर मग कर्मचारी काय करतात?असा प्रश्न उपस्थित होत आहे .
 

"अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे नवीन अधिष्ठाता रुजू झाल्यानंतर अम्बाजोगाई येथील रुग्णालयात खुप मोठे बदल होईल अशी अपेक्षा होती.परंतु नवीन अधिष्ठाता अम्बाजोगाई येथील प्रशासनिक अफरातफरी आणि कामचुकार लोकांना पाठीशी घालनारी प्रशासकीय साखली तोडून प्रशासनात पारदर्शकता आनतील असे वाटत असले, तरी सध्याची स्थिति पाहता त्यात त्यांना यश येईल असे वाटत नाही. स्वामी रामानन्द तीर्थ मेडिकल कॉलेज मधे पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनात व्याप्त भ्रष्टाचारांची साखली तोड़ने आवश्यक आहे.
      
एवढेच नाही तर अम्बाजोगाई मेडिकल कॉलेज परिसरात असलेले प्रधानमंत्री जन औषधि केन्द्रामधे गोर गरीब रुग्णाची खुलेआम लूट होत आहे आणि याची कल्पना प्रशासनातील सर्वच  वरिष्ठ अधिकार्यांना देखील असल्याचे सुत्रांनी सांगितल.

Sharing