पत्रकार अविनाश कदम यांना मातृशोक

Beed

पत्रकार अविनाश कदम यांना मातृशोक

आष्टी/प्रतिनिधी

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमतचे आष्टी तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांच्या मातोश्री सुमन भगवान कदम (वय - ७०) यांचे मंगळवार दि. ११ आॅगस्ट रोजी सकाळी ८:२५ वाजता अल्पशा आजाराने  निधन झाले.
त्यांचा स्वभाव मनमिळाऊ,प्रेमळ होता.त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.थोर संत भगवान बाबांच्या हाताने माळ घातली होती,आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा आष्टीचे लोकमतचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांच्या त्या मातोश्री होत्या.  त्यांच्यावर दुपारी ४:३० वाजता आष्टी येथील खंडोबा मंदिर परिसरातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ. सुरेश धस,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश शिंदे,नगरध्यक्ष भारत मुरकुटे, उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर,भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,कवि प्रा.अल्लाउद्दीन सय्यद,प्रा.बबन उकले,राजेंद्र लाड,राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा व चार मुली, सून, नातवंडे, परतोंडे असा परिवार आहे.

Sharing

Visitor Counter