धारुरमधील त्या कन्टेनमेंन्ट झोनची सुरक्षा वाऱ्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष का?

धारुरमधील त्या कन्टेनमेंन्ट झोनची सुरक्षा वाऱ्यावर
प्रशासनाचे दुर्लक्ष
किल्लेधारुर/प्रतिनिधी
शहरातील कसबा शिनगारे गल्ली येथे नुकताच एक रुग्ण आढळल्याने ही गल्ली कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. नगरपालिकेने बॅरिकेडस् लावून प्रतिबंध लावला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी प्रशासकिय कर्मच्यारी उपस्थित नसल्याने लोकांची रहदारी बिनदिक्कतपणे सुरू झाली.
शहरातील 11 ऑगस्ट रोजी कसबा शिनगारे गल्ली येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पूर्ण गल्ली सील नगरपालिका यांनी केली. बॅरिकेडस् लावून या गल्लीतील रहदारीला प्रतिबंधित करण्यात आले. कोरोना रुग्णाच्या संपर्कात असणार्यांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यांचे रिपोट येने बाकी आहे.मात्र या कंन्टेमेन्ट झोन येथे एकही प्रशासकिय कर्मचारी, चोख बंदोबस्त नसल्यामुळे लोकांची ये- जा सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा फैलाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून परिसर सील करण्यात येतो. त्यानुसार भागातील शिनगारे गल्ली सिल करण्यात आली खरी पण तशी व्यवस्था न केल्याने नागरिकांची रहदारी सुरू असल्याने इतरांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.








