किल्ले धारूर घाटात पुन्हा अपघात अरुंद घाटामुळे अपघाताची मालिका सुरूच
Dharur

किल्ले धारूर घाटात पुन्हा अपघात अरुंद घाटामुळे अपघाताची मालिका सुरूच
किल्लेधारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर घाटात बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास स्कॉर्पिओ MH43 V 9421 या नंबर च्या गाडीचे ब्रेक न लागल्यामुळे अपघात झाला यात कोणालाही जीवित हानी नाही. धारूर घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे तसेच कठडे उभारहावेत अशी मागणी नेहमी पासून किल्ले धारूर वासीय करत आहेत पण प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे यातच अपघाताची मालिका सुरूच आहे कालच गॅस घेऊन जाणार टँकर अरुंद घाटामुळे कठडयाला धडकून 300 फूट खोल दरीत पडता पडता राहिला तसेच कालचा टँकर काढला का नाही तो पर्यंत आज किल्ले धारूर कडून तेलगाव ला जाणारी स्कॉर्पिओ ब्रेक न लागल्यामुळे घसरत जाऊन दोन ते तीन पलटया खाल्या कसल्याही प्रकारची जीवित हानी नाही








