मोरफळी येथे शेतकऱ्यांना फवारणी वेळि सुरक्षितेचे व उत्पन्न वाढीची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मोरफळी येथे शेतकऱ्यांना फवारणी वेळि सुरक्षितेचे व उत्पन्न वाढीची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
धारूर/प्रतिनिधी
तालूक्यातील मोरफळी येथे तालूका कृषी कार्यालयाचे वतीने नानाजी देशमूख कृषी संजीवनी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना फवारणी चे वेळीची बाळागायची सुरक्षितता व उत्पादन वाढी साठी च्या उपाययोजना यांचे प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन देण्यात आले.
मोरफळी येते विजयमाला अर्जून खटके यांचे शेतात फवारणीच्या सुरक्षिततेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतमजुरांचे कौशल्य , गुणवत्ता ,दर्जा व वेग वाढविणे गरजेचे आहे. या अनुषंगाने पोखरा अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा झाली.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या अंतर्गत मोरफळी येते तालुका समन्वयक महादेव कणसे , व राठोड यांनी मार्गदर्शन केले . यावेळी सरपंच शेषेराव गडदे , सेवा सहकारी सोसायटी मोरफळी चे वरिष्ठ सहायक मोरे. ग्रा. प. चे संगणक परीचालक महादेव कोपरेटकर व गावातील तरुण शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.या कार्यशाळेत उपस्थित शेतमजुरांना कापूस पिकात फवारणी करतांना घ्यावयाची काळजी , ओषधा चि मात्रा तयार करणे , फवारणी पंपाची देखभाल करणे , ओषधा ची निवड , विष बाधा झाल्यावर घ्यावायचे प्रथमउपचार व पिकांच्या वाढीनुसार कीड व रोग नियंत्रण इत्यादी बाबत ची सर्व माहिती देण्यात आली.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गणेश दशरथ गडदे विशाल गडदे , अंगद कोळेकर , महेश कोळेकर , सदाशिव कोळेकर यांनी सहकार्य केले








