संघर्षकन्या पल्लवी कदम र.भ अट्टल कॉलेजकडून सन्मानित

Beed

संघर्षकन्या पल्लवी कदम र.भ अट्टल कॉलेजकडून सन्मानित       

गेवराई/प्रतिनिधी

संघर्ष कन्या पल्लवी सखाराम कदम या विदयार्थिनीने इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतिश( भाऊ ) चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आर.बी. अट्टल महाविदयालयात पल्लवीचा गुणगौरव व सत्कार १३ ऑगस्ट रोजी  करण्यात आला .
        पल्लवी सखाराम कदम ,रा. धोंडराई  सन २०१७  मध्ये जि.प.मा.शाळा धोंडराई येथे ७ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. पल्लवी हुशार आणि गुणवान विदयार्थिनी होती. तिचे आई - वडिल ऊसतोडीसाठी कारखान्यावर जात असत.  आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या . पल्लवीच्या संघर्षाची कहाणी शिक्षक  पांढरे व एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आमदार सतीश (भाऊ ) चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचली . आ. सतीष  चव्हाण यांनी दि.५ मार्च २o१७ रोजी धोंडराई येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आणि पल्लवीच्या कुटूंबियांना तात्काळ पंचवीस हजारांची रोख मदत केली . पल्लवीच्या पुढील शिक्षणासाठी प्रतिमहा ३००० रुपयांची मदत सुरू केली. पल्लवीच्या उच्च शिक्षणाची जबाबदारीसुध्दा आ.  चव्हाण यांनी स्वीकारली आहे . पल्लवीने मार्च २०२० च्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत ८६.८० टक्के गुण घेतले आहेत . त्यामुळे
आ.चव्हाण यांच्या सूचनेनुसार पल्लवीच्या यशाबद्दल तिचा गुणगौरव आर.बी.अट्टल महाविदयालयात प्राचार्या डॉ. रजनी शिखरे  व न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.एन. जगताप यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी उपप्राचार्य व्ही.पी.सांगळे, उपप्राचार्य प्रा. अशोक जगताप , तिचे गुरु पांढरे ,पानसंबळ  व पल्लवीचे वडील सखाराम कदम उपस्थित होते . यावेळी  सुरक्षित अंतराचे ,जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सन्मानित करण्यात आले.

Sharing

Visitor Counter