ओबीसींचा बुलंद आवाज ॲड.सुभाष (भाऊ) राऊत यांना वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ओबीसीचां बुलंद आवाज ॲड.सुभाष (भाऊ) राऊत यांना वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा
बीड/प्रतिनिधी
भुतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणुस आपण,आपल कुटुंब ,आपला संसार,आपला व्यवसाय या संकुचित विचारातच आपले आयुष्य जगत असतो.परंतु हे विश्वची माझे घर असं समजुन या भुतलावरिल प्रत्येक व्यक्तीशी आपलं काही तरी नातं आहे.ज्यामुळे आपण येथिल प्रतेकाच्या कामी यावे.असा विचार करणारे काही लोक आहेत.परोपकारातच ते आपलं आयुष्य जगत असतात.यातीलच एक नाव म्हणजे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड.सुभाष (भाऊ) राऊत आज दि.१५ आँगष्ट रोजी त्यांचा वाढदिवसा निमित्त त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.ॲड.सुभाष (भाऊ) राऊत यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ते चांगलेच परिचित आहेत.आखिल भारतिय महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष या पदावर कार्य करित असतांना कार्यकर्ता कसा असावा याचा आदर्श त्यांनी निर्माण केला.ओबीसी समाजाबरोबर इतर सर्वच समाजात त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे.आपण किती चांगले आहोत हे सांगतांना दुसऱ्यांना वाईट हिन लेखणं त्यांच्या स्वभावात नाही.गेल्या पंचविस वर्षापासुन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष या पदावर काम करित असताना त्यांना नाभिक,कुंभार,माळी,सुतार,भुई,सोनार,वंजारा,साळी,तेली,कोळी,कोष्टी,लोहार,गुरव,बागवान,आतार,मन्यार,कासार,अशा ओबीसी समुहातील,लहान-लहान जातिंना एकञीत करून ओबीसींचे मजबुत संघटन निर्माण केले आहे.ओबीसी चळवळीत काम करित असतांना ओबीसींचे जातनिहाय जनगनना व्हावी,विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे नियमित वाटप व्हावे,मंडल आयोगाची १००% अंमलबजावणी व्हावी ,ओबीसीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण असावे,ओबीसी आरक्षण टिकुन रहावे.अशा विविध प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने,मोर्चे, धरणे,रास्तारोको,करून ओबीसी चळवळ गतिमान केली.त्यांनी काढलेला धक्का लागे बुक्का मोर्चा महाराष्ट्रत चांगलाच गाजला होता.काही दिवसापुर्वी त्यांनी ओबीसींचा महामुकमोर्चा काढुन शासनाचे लक्ष वेधुन घेतले होते.विशेष बाब म्हणजे या महामोर्चात पहिल्यांदाच विद्यार्थी-विद्यार्थीनी,महिला-पुरूष,जवळपास तिन ते चार लाख ओबीसी सहभागी झाले होते.
वडील कै.किसनराव (दादा) राऊत यांचे अपघाती दु;खद निधन झालेले असतांना आणी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांना चौकशीच्या नावाखाली बोलावुन शासनाने सुडबुद्धीने कार्यवाही करत त्यांना जेलमध्ये असतांना ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे आपले कर्तव्य समजुन त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले हे विशेष.ओबीसींचे राष्ट्रीय नेत्वृत्व स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे निधन,ओबीसी चळवळीतील झुंजार नेतृत्व स्मृतीशेष हनुमंतराव उपरे यांचे निधन आणी ओबीसींचा बुलंद आवाज मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांना अटक झाल्यानंतर ओबीसी चळवळ पोरकी झाली होती.अशा परिस्थितीत अनेकांनी ओबीसी चळवळीतुन माघार घेतली.माञ सच्चा कार्यकर्ता आणी समाजसेवक कधिच माघार घेत नसतो हे ॲड.सुभाष (भाऊ) राऊत यांनी दाखवुन दिले.मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेबांवर खोटे आरोप करून सुडबुद्धीने अटक केल्यानंतर ओबीसी चळवळीला खंड पडु न देता अधिक जोमाने वाढविण्याचे काम केले आहे.त्यांच्या विविध आंदोलनांनी जेलमध्ये असतांनाही मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या पाठिशी संपुर्ण ओबीसी समाज असल्याचे दाखवुन देऊन त्यांनी भुजबळ साहेबांच्या भुजातील बळ वाढविण्याचे काम केले.नेत्यासाठी कार्यकर्ता,समाजासाठी समाजसेवक,मिञासाठी भाऊ,कुंटुबासाठी कर्ता पुरूष अशा विविध भुमिका या जिवनपटावर राबवल्या.आता कार्यकर्त्यांची एकच ईच्छ आहे ति म्हणजे मी ॲड.सुभाष किसनराव राऊत विधान परिषद सदस्य म्हणुन ईश्वर साक्ष शपत घेतो.








