धारूर शहरात प्रशासकीय ध्वजारोहन ची वेळ सकाळी 8-15 ला काही कार्यालयात ध्वजारोहन नाही

धारूर शहरात प्रशासकीय ध्वजारोहन ची वेळ सकाळी 8-15 ला काही कार्यालयात ध्वजारोहन नाही
धारूर/प्रतिनिधी
शहरात वेगवेगळ्या भागात पंधरा कंटेनमेंट झोन असून टपाल कार्यालय, पोलिस स्टेशन सह दोन बँका व एक खाजगी शाळा यामुळे ध्वजारोहनास मुकणार आहे.तर शासकीय तालूक स्तरीय मुख्यध्वजारोहनाचा वेळ सकाळी 8-15 ची करण्यात आली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन असलेल्या भागासाठी व लॉकडाऊन असलेल्या शहरांसाठी आदेश काढत स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहनाबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. सोशल डिस्टंटचा नियम पाळत ध्वजारोहन करण्याच्या सुचनांसह कंटेनमेंट झोन बाबत उल्लेख आदेशात केला आहे. कंटेनमेंट असलेल्या भागातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयात ध्वजारोहन करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा शहरात केवळ तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयात ध्वजारोहन होणार आहे. धारुर शहरात सध्या पंधरा कंटेनमेंट झोन असुन या पैकी एका कंटेनमेंट झोन मध्ये पोस्ट कार्यालय, जिल्हा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व एक खाजगी शाळा आहे. तर पोलिस स्टेशनही स्वतंत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेले आहे. यामुळे या ठिकाणी उद्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहन होणार नाही. कोविड काळात पुरातत्व खात्याने राज्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवली असली तरी येथील ऐतिहासिक किल्ल्यात ध्वजारोहन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी दिली आहे व तहसील कार्यालयातील तालूकास्तरीय मुख्य प्रशासकीय ध्वजारोहणाची वेळ बदलण्यात आली असून सकाळी 8- 15 मिनीटानी येथिल ध्वजारोहन वरीष्ठाचे आदेशा नूसार होणार असल्याचे सांगीतले . शहरातील परंपरेनुसार करण्यात येणाऱ्या हु.काशिनाथ चौका जवळही कंटेनमेंट झोन असल्याने वरीष्ठांच्या मार्गदर्शनानूसार ध्वजारोहनाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितिन बागुल यांनी सांगितले.








