सहा शहरामधील कोषागारे व उपकोषागारे कार्यालये सुरु करण्यास २० ऑगस्ट २०२० पासून परवानगी
Beed

सहा शहरामधील कोषागारे व उपकोषागारे कार्यालये सुरु करण्यास २० ऑगस्ट २०२० पासून परवानगी
बीड/प्रतिनिधी
बीड, अंबाजोगाई, माजलगांव, परळी, केज व आष्टी या 06 शहरामधील कोषागारे व उपकोषागारे कार्यालये २० ऑगस्ट २०२० पासून सुरू करणेस परवानगी देण्यात आली आहे
कोरोना विषाणू रुग्णांची संख्या बीड जिल्हयात मोठया प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बीड, अंबाजोगाई, माजलगांव, परळी, केज व आष्टी हे 06 शहर 10 दिवसांकरिता दिनांक 12 पासून दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत पूर्णपणे सर्व दृष्टीने बंद असल्याने या निर्देशानुसार कोषागारे व उपकोषागारे कार्यालये सुरू करण्यात येणार असून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ओळखपत्राचा वापर करून दैनंदिन अंतर्गत कामकाज करू शकता असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे








