आज 225 कोरोना रुग्ण होणार कोरोना मुक्त!

Beed

आज 225 कोरोना रुग्ण होणार कोरोना मुक्त!

बीड/प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे परंतु या सोबतच कोरोना मुक्त देखील तेवढ्याच प्रमाणावर होत आहे आजचा तिसरा दिवस आहे कोरोना मुक्त होणारे द्विषतक चालूच आहे यामुळे कोरोनाला भिण्याची गरज नाही परंतु काळजी घेण्याची गरज आहे.

आज होणारे कोरोना मुक्त खालील प्रमाणे आहेत आज दि . 19 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातून तब्बल 225 रूग्ण कोरोनामुक्त होवून ते घरी जात आहेत . यामध्ये सर्वाधित बीडमधील 161 रूग्णांचा समावेश आहे . त्यापाठोपाठ आष्टी नऊ , शिरूर 3 , गेवराई 3 , माजलगाव 7 , धारूर 3 , केज 12 , अंबाजोगाई 14 आणि परळीतील 13 रूग्ण बरे होवून घरी परतणार आहेत . जिल्ह्यात 2972 रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1231 रूग्णांवर उपचार सुरू आहे आशी माहिती भेटली.

Sharing

Visitor Counter