धारूर कोविड केअर सेंटर मधून तीन कोरोना योध्यासह सात जन कोरोना मुक्त

धारूर कोविड केअर सेंटर मधून तीन कोरोना योध्यासह सात जन कोरोना मुक्त
किल्लेधारुर/प्रतिनिधि
धारूर येथील कोविड १९ केअर सेंटर मधून तीन पोलीस कर्मचारी कोरोना योध्या यांच्या सह सात व्यतींनी कोरोना वर मात केली आहे
अंबाजोगाई येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता धारूर येथे 9 ऑगस्ट रोजी कोविड 19 केअर सेंटर सुरू करण्यात आले येथे 44 रुग्ण उपचार घेत आहेत आज सात रुग्णांनी कोरोणा वर मात केली त्यात तीन पोलिस कर्मचारी, घागरवडा येथील पाच वर्षीय बालक, शिक्षक कॉलनीतील दोन नागरिक, उदयनगर येथील एक नागरिक आज कोरोना मुक्त झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन शेकडे, डॉ चेतन आदमाने यांनी सांगितले आहे
यशस्वी उपचाराने सात रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने आरोग्य विभागाचे धारूर शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे कोविड 19 आजारावर विजय मिळवलेल्या योद्धे यांचे टाळ्या वाजवून, गुलाब पुष्प देवून स्वागत करून घरी पाठवण्यात आले कोरोना मुक्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता








