लोकांची दैना, कोणीच पाहिना ! कादरी बाग भागात पसरली अस्वच्छता, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लोकांची दैना,कोणीच पाहीनाा ! कादरी बाग भागात पसरली अस्वच्छता, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
धारूर/प्रतिनिधि
धारूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 कादरी भागात अस्वच्छता पसरली आहे रस्त्यावर पाणी येत असून नाल्या तूंबल्या आहेत यामुळे सर्वत्र अस्वछता पसरली आहे घाणीचे साम्राज्य झाले आहे या गंभीर बाबीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष का दिसत आहे.
सततच्या रिमझिम पावसामुळे खड्यात पाणी जमा होत असून नागरिकांना येता जाता देखील येत नाही चिखलातून रस्ता शोधावा लागत आहे अगोदरच कोरोना महामारीचे संकट त्यात बाहेर अस्वच्छता त्यामुळे येथील नागरिक कमालीचे वैतागले आहेत लेखी व तोंडी सांगून देखील नगरपरिषद काहीही उपाय करत नसल्याचे आरोप येथील नगरसेवकांनी केला आहे नगरसेवकांचे जर कर्मचारी ऐकत नसतील त्यांचे कामे होत नसेल तर सामान्य जनतेचे काय? याचा विचारही न केलेला बरा त्वरित नगरपरिषदेने स्वच्छता करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत
या भागात नागरिकांना जानुण बुजुन त्रास देता का ?
प्रभाग क्रं.3 कादरी बाग या भागात दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत त्यामुळे जाणून बुजून सत्ताधारी या भागातील स्वच्छते कडे दुर्लक्ष करत आहेत का? कारण इतर प्रभागात भाजपाचे नगरसेवक असल्याने तेथील कामे लवकर होतात मग या ठीकानचे का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे या भागाचे होत नाही मुख्यधिकरी यांना सांगून देखील ते दुर्लक्ष करत आहेत.