भारतीय जैन संघटनेच्यावतीने आ.सुरेश धस यांचा सन्मान

भारतीय जैन संघटनेच्यावतीने आ.सुरेश धस यांचा सन्मान
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
समाजात काम करत असतांना आपल्या कामाची दखल समाजात कोणीतरी घेत असतेच पण चांगले काम करणा-यांना भारतीय जैन संघटना नेहमीच प्रोत्साहन देत असते,आज माझा झालेला सन्मान म्हणजे अधिक काम करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
आष्टी तालुका भारतीय जैन संघटना व तिरुमाला गृपच्या वतीने आज दि.१८,१९व २०रोजी अॅटीजन टेस्टमध्ये काम करणा-या आष्टी शहरातील तिन्ही केंद्रांवरील वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी,महसूल,नगर पंचायत,पोलिस प्रशासन,शिक्षक यांच्यासह आ.सुरेश धस यांचा सत्कार गुरुवार दि.२० रोजी सकाळी ११ वा. कन्या प्रशाळेत करण्यात आला.यावेळी सत्कारास उत्तर देतांना आ.धस बोलत होते.यावेळी तहसिलदार वैभव महिद्रकर,भारतीय जैन संघटनेचे संजय मेहेर,भारत मुरकुटे,
आदी मान्यवर उपस्थीत होते.
पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,भारतीय जैन संघटना नेहमी सामाजिक काम करणा-यांची वेळोवेळी दखल घेत आहे.आज देशात कोरोना सारख्या भयंकर रोगामुळे सर्वञ विस्कळीत पणा आलेला आहे.आजही या रोगावर कसल्याही प्रकारचा ईलाज नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना आणि त्यांना सहकार्य करणारे इतरांनी जे काम हातात घेतले आहे त्याला निश्चितच लवकरच यश मिळेल आणि देश पुर्वपदावर येईल तसेच माझा सन्मान यावेळी आपण केला हा सन्मान म्हणजे अधिक काम करण्याची प्रेरणा देणारा असेल असेही आ.धस शेवटी म्हणाले.यावेळी
बाळू मेहेर,विजय मेहेर,नवनीत कटारीया,रवि मेहेर,सुनिल मेहेर,राहूल मुथ्था,गिरीष जोगी,राजेंद्र जोशी,भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष शेखर मुथ्था,सचिव प्रितम बोगावत,राहूल शिंगवी,पारस मेहेर,इश्वर कटारिया,अमोल भंडारी,वैभव लाहोटी,पञकार सचिन रानडे,प्रविण पोकळे,अनिरूध्द धर्माधिकारी आदी उपस्थीत होते.








