वाकी चेकपोस्टवर मेकॅनिक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तू पासून बनवले सॅनिटाइझर मशीन

वाकी चेकपोस्टवर मेकॅनिक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तू पासून बनवले सॅनिटाइझर मशीन
आष्टी/काराम गणगे
बीड प्रसार न्युज
वाकी चेक पोस्टवर प्रज्वलित गौतम ससाने या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तु पासून सॅनिटाइझर मशीन बनवले आहे.बीड जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सॅनिटाइझ करूनच सोडले जाते, यामध्ये हँड वॉश स्टेशनही बनवले आहे. यामुळे चेक पोस्टवर ड्युटी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटाइझ होण्यास मदत होते त्यामुळे कोरोना१९ रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होणार आहे.आज चेक पोस्टचे सहा, पोलीस उपनिरीक्षक श्री वराट साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉ. बंडू करडुळे,श्रीमंत सोनवणे, वाघुले सर,नंदू अस्वर आदी उपस्थित होते.त्याच्या या कामगिरी बद्दल वाकीचे सरपंच दिलीप ससाणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.








