तांदळवाडी येथे कृषिदूत महेश शिनगारे यांचे शेतीविषयक मार्गदर्शन
तांदळवाडी येथे कृषिदूत महेश शिनगारे यांचे शेतीविषयक मार्गदर्शन
किल्ले धारूर/प्रतिनिधी
धारूर तालुक्यातील तांदळवाडी येथे ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी महाविद्यालय अहमदनगर येथील कृषिदूत महेश नामदेव शिनगारे याने बीज पक्रिया कशी करायची व त्याच्या पद्धती कोणत्या आहेत या विषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
त्यांनी जैविक व केमिकल या दोन्ही बीज प्रक्रिया कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती दिली.बाजरीवरील बीज प्रक्रिया कशी करायचे याचे प्रात्यक्षिक त्याने शेतकऱ्यांना करून दाखवले व बीज प्रक्रियेचे फायदे शेतकऱ्यांना समजून सांगितले.
त्याला कृषी महाविद्यालय अहमदनगर येथील प्राचार्य एम.बी.धोंडे सर व विषय तज्ञ प्रा.ढमाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.
महेश शिनगारे हा धारूर येथील रहिवासी असून सध्या तो कृषी महाविद्यालय अहमदनगर येते कृषी पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.